राज्यातील 53 शिक्षकांना सर फाउंडेशनचे पुरस्कार

राज्यातील 53 शिक्षकांना सर फाउंडेशनचे पुरस्कार

सोलापूर : 'आयआयएम' अहमदाबाद व सर फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने राज्यातील 53 शिक्षकांना 'टीचर इनोव्हेशन अवॉर्ड' जाहीर झाले आहेत. त्याचे वितरण अक्कलकोट येथे सहा व सात ऑक्‍टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. 

प्राथमिक, माध्यमिक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली आहे. अक्कलकोट येथे सहा व सात ऑक्‍टोबरला 'इनोव्हेटिव्ह प्रॅक्‍टिसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स' होत आहे. त्यामध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ, राज्य महिला समन्वयक हेमा शिंदे यांनी केले आहे. 

पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक : 
संतोष बोडखे, दत्तात्रय शिंदे, शोभा कोकाटे- नगर
रंजना स्वामी, दीपाली सबसगी - उस्मानाबाद
सरला कामे -औरंगाबाद
रंजिता काळेबेरे, कृष्णा भोसले, जयसिंग पडवळ -कोल्हापूर
लोकेश चौरावार -गोंदिया
अलंकार वारघडे, शारदा चौधरी - ठाणे
दिलीप केने - नागपूर
गजानन कासमपुरे-अमरावती
वैशाली सूर्यवंशी-नाशिक
विजय पावबाके, राजन गरुड-पालघर
माधुरी वेल्हाळ, अरविंद मोढवे-पुणे
सोमनाथ वाळके-बीड
स्पृहा इंदू, स्मृती वावेकर-मुंबई उपनगर
संदीप कोल्हे-यवतमाळ
सुखदा कारेकर, वैशाली झोरे-रत्नागिरी
चित्ररेखा जाधव-रायगड
शोभा माने-लातूर
नीता तोडकर-वाशीम
अजय काळे-सांगली
प्रकाश कदम, लीना पोटे-सातारा
राजकिरण चव्हाण, कल्पना घाडगे, मनीषा पेटकर, अनुराधा काजळे, प्रिया धुमाळ, शरण्णाप्पा धुमाळ, परवेज शेख, सुप्रिया शिवगुंडे, मोतीलाल जाधव, शाहीनसुल्ताना शेख - सोलापूर. 

माध्यमिक शिक्षक : 
मच्छिंद्र कुंभार-कोल्हापूर
सुनील बडवाईक-नागपूर
जयवंत ठाकरे, मधुकर घायदार-नाशिक
मिलिंद दीक्षित-वर्धा
हनुमंत राऊत, संजय जवंजाळ-सोलापूर
अनुष्का कदम-सिंधुदुर्ग

अधिकारी : श्‍वेता फडके, महेंद्र धिमते-ठाणे, स्वाती स्वामी-सोलापूर, कमलाकर सावंत-लातूर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com