
Sanjay Shirsat: चंद्रकात खैरेंच्या बाजूला बसून संजय शिरसाटांची टोलेबाजी, म्हणाले मोठे कसेही वागले...
शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेल्या दोन्ही गटातून कायमच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. शिंदेंच्या बंडाने शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसून येतात. मात्र, औरंगाबाद शहरात आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक वेगळंच चित्र दिसून आलं.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे मांडीला मांडी लावून एकाच सोफ्यावर बसलेले दिसून आले. एकमेकांवर टोकाची टीका करणारे दोन्ही नेते एकाच सोफ्यावर दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. जरी ते मांडीला मंदी लावून बसले असले तरी तिथेही त्यांनी एकमेकावर निशाणा साधल्याचे दिसून आले.
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट बोलताना म्हणाले की, जे ज्येष्ठ असतात त्यांचा आदर करावा लागतो, शिवसेना आणणाऱ्यांपैकी आम्ही आहोत.काही व्हिआयपी चेअर्स असतात त्यामधली ही एक आहे. चंद्रकांत खैरे यांनी आज जिल्ह्याच नेतृत्व केलं आहे. त्यामुळे त्यांच्या शेजारी बसण्यात काहीच वावग नाही. शेजारी बसण्यात काहीच अडचण नाही असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल अजुनही आदर आहे का विचारल्यानंतर संजय शिरसाट म्हणाले, तसं नाही काही. आजचा क्षण वेगळा आहे. उद्या जर आमच्या शेजारी इम्तियाज जलील आमच्या शेजारी बसले तर काय आम्ही त्यांच्या पक्षाचे झालो का? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पक्षपात नसतो असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
जे जेष्ठ नेते असतात त्यांचा आदर करावा लागतो शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हेच शिकवलं आहे. मोठ्यांचा आदर करा, मोठे कसे जरी वागळे तरी हरकत नाही पण त्यांचा आदर ठेवला पाहिजे असंही संजय शिरसाट म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना प्रश्न केला की, राजकारणात काही होऊ शकत, पण तुम्ही संजय शिरसाट यांना शुभेच्छा देणार आहात का? यावर खैरे म्हणाले की, काही हरकत नाही शुभेच्छा देण्यासाठी त्यावर पुन्हा संजय शिरसाट म्हणाले की, ते माझे दुश्मन थोडी ना आहेत.
काही झालं तरी गेली 38 वर्षे आम्ही सोबत काम केलं आहे. जिलयातील सीनियर नेत्यांपैकी आम्ही दोघे आहोत. शिवसेनेतील जुने दिवस आम्ही सोबत पहिले आहेत असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.