विजापूरजवळ अपघातात सहा ठार, 24 जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

अंत्यसंस्कार करून परतत असताना शनिवारी मालवाहू वाहनाचा अपघात होऊन सहा जण ठार, तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात हंदीगनूर-चिंचळी वळणाजवळ घडला.

विजापूर : अंत्यसंस्कार करून परतत असताना शनिवारी मालवाहू वाहनाचा अपघात होऊन सहा जण ठार, तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात हंदीगनूर-चिंचळी वळणाजवळ घडला. चालकाचा ताबा सुटल्याने मोटार उलटली. दुर्घटनेत चार जण जागीच ठार, तर उपचारासाठी घेऊन जात असताना वाटतेच दोघांचा मृत्यू झाला.

बागलकोट जिल्ह्यातील गुळडेगुड तालुक्‍यातील हळदूरमधील सनदी आणि मोकाशी कुटुंबीय विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्‍यातील कंदगनूर येथे एका नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला गेले होते. तेथून पुन्हा गावी परतत असताना हा अपघात झाला. हंदीगनूर-चिंचळी क्रॉसजवळ वळणावर चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याकडेला उलटली. त्यात चौघे जागीच ठार झाले. रुग्णालयात नेताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला.

जखमींना मुद्देबिहाळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी झालेल्यांना बागलकोट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six killed and 24 injured in Vijapur accident