'शेकाप' हाच राजकीय पर्याय- प्रविण गायकवाड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जानेवारी 2017

मुंबई: संभाजी ब्रिगेड मध्ये 25 वर्षे सामाजिक काम केल्यानंतर राजकीय पर्याय म्हणून शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रविण गायकवाड यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले.

मुंबई प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील उपस्थित होते. 12 जानेवारीला शनिवारवाड्यावरील शेतकरी मेळाव्यात गायकवाड हे 'शेकाप' मध्ये प्रवेश करणार आहेत. त्याबाबातची आज माहिती देण्यात आली.

'संभाजी ब्रिगेड ही सामाजिक चळवळ आहे. आम्ही सर्वच जण या चळवळीचे कार्यकर्ते आहोत. पण राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी 'शेकाप'ची विचारधार अधिक जवळची वाटते. शेतकरी व कामगार यांच्यासाठी काम करताना उपेक्षित व वंचित घटकांना न्याय हक्क मिळवून देण्याचा सतत प्रयत्न राहील,' असे गायकवाड म्हणाले.

दरम्यान, संभाजी ब्रिगेड हा स्वतंत्र पक्ष असताना तुम्ही 'शेकाप' मध्ये का गेलात असे विचारले असता, कार्यकर्त्यांना प्रत्येकाला स्वत:चा अधिकार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, मराठा मोर्चा बाबत आता बोलण्याचा मला अधिकार नाही. मराठा क्रांती मोर्चाची भूमिका मी आता राजकीय पक्षाचा कार्यकर्ता झाल्याने मांडणे उचित नाही, असेही गायकवाड यांनी स्षष्ट केले.

Web Title: SKP only political option, Says Pravin Gaikwad