शाश्‍वत शेतीसाठी "स्मार्ट' योजना 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - शेती विकासाचे तंत्र बदलत असताना शेतीचा विकास शाश्‍वत व्हायला हवा. सततच्या संकटातून शेती दूर राहून फायद्याची होईल. यासाठी "स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील दहा हजार गावांत येत्या दोन ते तीन वर्षांत बदललेले चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 

मुंबई - शेती विकासाचे तंत्र बदलत असताना शेतीचा विकास शाश्‍वत व्हायला हवा. सततच्या संकटातून शेती दूर राहून फायद्याची होईल. यासाठी "स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील दहा हजार गावांत येत्या दोन ते तीन वर्षांत बदललेले चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने स्मार्ट (स्टेट ऑफ महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्स्फॉर्मेशन) या प्रकल्पाचे फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम झाला. या प्रकल्पाअंतर्गत टाटा, वॉलमार्ट, ऍमेझॉन आदी नामांकित कंपन्यांदरम्यान सामंजस्य करार झाले. कार्यक्रमास सुभाष देशमुख, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, मुख्य सचिव डी. के. जैन आदी उपस्थित होते. 

यावेळी फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात दहा हजार गावात कृषी व्यवसायाचा विकास होणार आहे. त्यासाठी जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य केले आहे. राज्य सरकारच्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात पाण्याचे विकेंद्रीत साठे तयार झाले आहेत. त्यामुळे कमी पाऊस होऊनही शेती उत्पादकता वाढली आहे. मात्र, उत्पादन वाढल्यानंतर शेतीमालाच्या दराचाही प्रश्‍न निर्माण होतो. त्यापार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची साखळी तयार करून विविध कार्यकारी संस्था, शेतकरी गट, कंपन्या यांना सक्षम केले तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव आणि कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. कंपन्यांनाही थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार आणि वाजवी किंमतीत शेतीमाल मिळेल. शेतकऱ्यांनाही खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध होईल. शेतीचे क्षेत्र शाश्‍वत झाले पाहिजे. तरच शेतीवरचे संकट दूर होईल. शेती फायद्याची होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Smart plan for sustainable farming