'ठाकरे'वरून अंजली दमानियांचा शिवसेनेवर 'बाण'

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई : 'ठाकरे' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत शिवसेनेच्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र विरोध केला. त्यावर दमानिया म्हणाल्या, ''आपण सर्व लोकशाहीत राहत आहोत. येथे कायद्याचे राज्य असून, जुलूमशाही नाही. शिवसेनेची अशी हिंमत होते कशी? यांसारख्या लोकांना तुरुंगात टाकावे''.

'ठाकरे' चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार आहे, त्यादिवशी अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांना दिला. त्यावरून दमानिया यांनी शिवसेनेवर टीका केली. त्या म्हणाल्या, ''आपण सर्व लोकशाहीत राहतो. येथे कायद्याचे राज्य आहे. जुलूमशाही नाही. शिवसेनेची अशाप्रकारे हिंमत होते कशी? अशा लोकांना तुरुंगात टाकायला हवे'', अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

दरम्यान, 25 जानेवारीला 'ठाकरे' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याबाबत लोकरेंनी फेसबुक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये 25 जानेवारीला अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास 'शिवसेना स्टाइल'ने उत्तर देऊ, असा इशारा लोकरे यांनी दिला. त्यावरून दमानिया यांनी हे  वक्तव्य केले आहे. 
 
Web Title: Social Activist Anjali Damania Criticizes Shivsena over Thackeray Film Issue