किस केलं चूकलं माझं, दुचाकीवरील रोमिओनं मागितली माफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद
किस केलं चूकलं माझं, दुचाकीवरील रोमिओनं मागितली माफी

किस केलं चूकलं माझं, दुचाकीवरील रोमिओनं मागितली माफी

काहीतरी वेगळं करुन लक्ष वेधून घेणाऱ्या तरुणाईला अनेकदा आपण काय करतो आहोत याचं भान राहत नाही. सदसदविवेकबुद्धी बाजुला ठेवून बेशिस्तपणे काहीही करणाऱ्या तरुणाईच्या उत्साहाला लगाम घालण्याचं काम औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी केलं आहे. कालपासून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक तरुण आपल्या मैत्रीणीला दुचाकीवर बसवून तिला किस करत असल्याचे दिसून आले होते. त्यानं तो व्हिडिओ सोशल मीडिय़ावरही (Social Media) शेयर केला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून चांगलीच अद्दलही घडवली आहे. त्यानंतर त्यानं माफीही मागितली आहे. त्यानं त्याच्या माफीनाम्यामध्ये जे सांगितलं त्यावरुन पोलिसांनी त्याची बराच वेळ शाळा घेतल्याचे कळून येते.

औरंगाबाद काल चर्चेत आलं होतं ते दुचाकीवरील किसिंगच्या व्हिडिओनं. शहरातील रस्त्यावरुन एक तरुण तरुणी दुचाकीवर मोठ्या आनंदात फिरत होते. मात्र त्यांच फिरणं हे चार चौघांसारखं मुळीच नव्हते. दुचाकीवर त्यांचे चाललेले अश्लील चाळे सोशल मीडियावर व्हाय़रल झाले आहे. सार्वजनिक ठिकाणचे नियम पायदळी तुडवून त्यांनी बेशिस्तपणाचे प्रदर्शन केल्याचे दिसून आल्यानं अखेर पोलिसांना या हिरोगिरीची दखल घ्यावी लागली आहे. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेवून चौकशी सुरु केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो जागेवर आला. आणि माफी मागु लागला.

हेही वाचा: औरगाबाद : पाडापाडीसाठी प्रशासन सज्ज

माझी चूक झाली. यापुढे असे कृत्य करणार नाही. असं त्यानं पोलिसांना सांगितलं. औरंगाबाद शहरातील बीड बायपास (Beed Bypass) परिसरात राहणारा तरुण आणि त्याची मैत्रीण दोघे बाईकवर ३१ डिसेंबर रोजी हा अश्लील आणि धोकादायक स्टंट केला होता. क्रांती चौक ते सेव्हन हिल्स आणि सेव्हन हिल्स ते क्रांती चौक (Kranti Chowk) या अंतरामध्ये त्या दोघांनी मित्रासोबत चॅलेंज लावले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चँलेजची पोलिसांनी दखल घेऊन त्या तरुणाला वठणीवर आणले आहे.

हेही वाचा: न्यासा देवगणची बॉलीवूड एन्ट्री ठरली; तिच्या बोल्ड फोटोनी दिले संकेत..

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top