सोशल मीडियात भाजपवर पलटवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अगोदरपासून सोशल मीडियात प्रचंड प्रतिसाद असलेल्या भाजपवर सोशल मीडियातूनच आता कठोर पलटवार सुरू आहे. सोशल मीडिया हे दुधारीशस्र असल्याचे मानले जाते, याची प्रचिती आता भाजपवर सुरू असलेल्या कोट्या, टिप्पण्यांवरून येत आहे. 

भारतीय जनता पक्षाला "गाजर पार्टी' अशी दिलेली उपमा सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चेत आहे. व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्विटरवर भाजपच्या भूमिकेवर सडकून टीकास्त्र सुरू आहे. "पार्लमेंन्ट पालिका, गाजराची मालिका' अशा शब्दांत भाजपवर टीका सुरू आहे. राज्यभरात प्रत्येक जिल्हा तालुक्‍यात गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना भाजपने पक्षात प्रवेश दिल्याचे हे पडसाद असल्याचा दाखलाही दिला जात आहे. "पार्टी विथ डिफरन्स' असं ब्रिद असलेल्या भाजपला आता "पार्टी विदाऊट रेफरन्स' असं म्हणायला हवं, अशा मार्मिक कोट्याही सोशल मीडियात सुरू आहेत. पुण्यात तर टिपिकल पुणेरी पाट्यांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्याच्या दौर्याच्या निमित्ताने खिल्ली उडवली आहे.' आता पुण्याला पण मिळणार गाजर... कारण सभेला येताहेत सर..' अशी एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. यात गाजरावर बसलेले मुख्यमंत्री दाखवले आहेत. सोशल मीडियात सर्वाधिक सकारात्मक प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपला सध्या नकारात्मक प्रचाराचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. 

अखेर, सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र भाजपवरच उलटल्याचे तूर्तास चित्र आहे. 

Web Title: Social media slams BJP