सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक जूनमध्येच! ‘वन बार वन वोट’अंतर्गत अनेक सदस्य वकिलांची नावे होणार कमी

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक आता थेट जून २०२४ मध्येच होईल, अशी चर्चा आहे. ‘वन बार व वोट’अंतर्गत आता प्रत्येक वकिलाला तालुका किंवा जिल्हा स्तरावरील बार असोसिएशनसाठीच मतदान करता येणार आहे. तत्पूर्वी, दोन्हीकडे नावे असलेल्यांना पर्याय दिला जाणार आहे.
Advocate
Advocatesakal

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक आता थेट जून २०२४ मध्येच होईल, अशी चर्चा आहे. ‘वन बार व वोट’अंतर्गत आता प्रत्येक वकिलाला तालुका किंवा जिल्हा स्तरावरील बार असोसिएशनसाठीच मतदान करता येणार आहे. तत्पूर्वी, दोन्हीकडे नावे असलेल्यांना पर्याय दिला जाणार आहे. सोलापूर न्यायालयात प्रक्टिस करणारेच वकिल सोलापूर बारचे सदस्य असणार आहेत.

सोलापूर बार असोसिएशनची मागील निवडणूक नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडली होती. त्यात ॲड. सुरेश गायकवाड यांनी बाजी मारली आणि अध्यक्षपदी ते विराजमान झाले. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ आता संपणार असल्याने बार असोसिएशनची निवडणूक पुढच्या महिन्यात होईल म्हणून अनेकजण आतापासूनच तयारी करीत आहेत. परंतु, बारच्या घटनेनुसार दरवर्षी जून महिन्यात निवडणूक होते. त्यामुळे सध्याचे पदाधिकारी जूनपर्यंत राहतील, असेही सांगितले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभेची निवडणूक होत असल्याने बार असोसिएशनचे पदाधिकारी प्रलंबित कामे मार्गी लावतील, असा विश्वास विद्यमान अध्यक्ष ॲड. गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर बार असोसिएशनची निवडणूक घेतली जाते. पण, कोरोनामुळे हे वेळापत्रक कोलमडले असून मागील जूनऐवजी निवडणूक नोव्हेंबरमध्येच झाली होती. हाच धागा पकडून आता बार असोसिएशनची निवडणूक जानेवारी किंवा जूनमध्ये होईल, असे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. परंतु, आता बार असोसिएशनसाठी इच्छुक असलेल्यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अडीचशे ते तीनशे सदस्य कमी होतील

सोलापूर बार असोसिएशनचे सध्या एक हजार ४६७ वकिल सदस्य आहेत. दुसरीकडे साडेतीन हजार सदस्यांची नोंदणी आहे, पण वर्गणी न भरल्याने अनेकांना मतदानाचा अधिकार नाही. त्यांच्याकडून वर्गणी भरून घेऊन त्यांना अधिकृत सदस्य करून घेतले जाणार आहे. तत्पूर्वी, सध्याच्या मतदारांमध्ये २५० ते ३०० वकिल सदस्य कमी होतील, अशी सद्य:स्थिती आहे. तत्पूर्वी, त्यांना तालुक्याच्या किंवा सोलापूर बार असोसिएशन यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.

तालुका बार असोसिएशनला पत्रव्यवहार करून कार्यवाही

‘वन बार वन वोट’नुसार जे वकिल सदस्य तालुका बार असोसिएशन व सोलापूर बार असोसिएशनमध्ये मतदान करतात. त्यांना पत्रव्यवहार करून दोन्हीपैकी एक पर्याय निवडण्याची संधी दिली जाणार आहे. अडीचशे ते तीनशे सदस्य असे असून त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या बार असोसिएशला पत्रव्यवहार केला जाणार आहे.

- ॲड. सुरेश गायकवाड, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com