Solapur News : चुलीतली ठिणगी ठरली काळ; वृद्ध पती-पत्नीचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Barshi
Solapur News : चुलीतली ठिणगी ठरली काळ; वृद्ध पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

Solapur News : चुलीतली ठिणगी ठरली काळ; वृद्ध पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं एक दुर्दैवी घटना घडली आहे. चुलीतली एक ठिणगी पती- पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. पाणी तापवण्यासाठी त्यांनी चूल पेटवली होती.

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या गाडेगाव इथं पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये भीमराव काशीराम पवार (९५) आणि कमलबाई भीमराव पवार (९०) या वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

'साम'ने दिलेल्या माहितीनुसार, कमलबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या आणि त्यांनी अंघोळीचं पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली. पाणी तापवत ठेवलं आणि घराबाहेर म्हशीला चारापाणी करण्यासाठी गेल्या. म्हैस बांधत असतानाच चुलीतून ठिणगी उडाल्याने त्यांच्या झोपडीने पेट घेतला.

त्यांचे पती भीमराव घरातच झोपले असल्याने कमलबाई आग पेटलेली असतानाच झोपडीत शिरल्या. पण तोवर आगीने रौद्ररुप धारण केल्याने दोघांनाही घराबाहेर पडला आलं नाही. गावकरी मदतीसाठी धावून आले, पण तोवर उशीर झाला होता. या आगीत होरपळून दोघांचाही मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Accident firesolapur city