मुख्यमंत्र्यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

सोलापूर - कर्जमाफीसाठी नेमलेल्या उच्चस्तरीय सुकाणू समितीने रविवारी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांशी मोबाईलवर संवाद साधत शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी या घोषणेनंतर साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापुरात आज "सबका साथ, सबका विकास' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम मध्यावर आला असतानाच कर्जमाफीची घोषणा सुकाणू समितीने जाहीर केली. त्या वेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मोबाईलवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल व या निर्णयानंतर पहिल्यांदाच सोलापुरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधल्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. 

Web Title: solapur news farmer strike Devendra Fadnavis