ऑनलाइन अर्ज भरण्यात जळगाव नंबर वन 

प्रमोद बोडके
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सोलापूर - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून ऑनलाइन अर्ज भरण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक 1 लाख 55 हजार 758 शेतकऱ्यांचे अर्ज आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरले गेले आहेत. राज्यातील एकूण 13 लाख 93 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. 

सोलापूर जिल्ह्याने ऑनलाइन अर्ज सादर करण्यात राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. सोलापूर जिल्ह्यातून 92 हजार 73 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. जळगाव पाठोपाठ पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 1 लाख 42 हजार 763, सातारा जिल्ह्यातून 96 हजार 895 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. ज्या नगर जिल्ह्यातून राज्यभरात शेतकरी क्रांती मोर्चाचे लोण राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले त्या नगर जिल्ह्यातून 91 हजार 380 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. 

नाशिक जिल्ह्यातून 85 हजार 828 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यात पालघर जिल्हा सर्वांत पिछाडीवर आहे. या जिल्ह्यातून 1 हजार 213, त्या पाठोपाठ परभणी जिल्ह्यातून 8 हजार 313 एवढ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिनिधित्व करत असलेल्या नागपूर जिल्ह्यातूनही कर्जमाफीचे अर्ज भरण्यात फारशी प्रगती नसल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्यातून आठ हजारांच्या आसपास शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. 

मुदत मिळाल्यास निश्‍चित होईल वेळापत्रक 
कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यास अद्यापपर्यंत मुदत देण्यात न आल्याने कर्जमाफीच्या माहितीची मोहीम कुठपर्यंत चालणार, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार? याबाबत ठोस काहीच माहिती ना अधिकाऱ्यांना आहे ना लोकप्रतिनिधींना. कर्जमाफीची कालबद्ध प्रक्रिया निश्‍चित करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदत निश्‍चित करण्याची आवश्‍यकता आहे. 

Web Title: solapur news loan farmer jalgaon online