मोदी सरकारचे लवकरच "स्लीप डाउन...' - सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सोलापूर - 'सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने सुरू केलेल्या "स्टॅण्डअप' योजनेचे सध्या "सीट डाउन' आहे. लवकरच सरकारचे "स्लीप डाउन' होईल,'' असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. भविष्यात प्रणिती राज्यमंत्री, मंत्री आणि कदाचित मुख्यमंत्रीही होऊ शकेल,'' असा विश्‍वासही त्यांनी बुधवारी व्यक्त केला.

शिंदे यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पागोष्टी केल्या. ते म्हणाले, 'नोटाबंदी व जीएसटीमुळे जनता भयंकर त्रस्त झाली आहे. त्याचा फटका निश्‍चितच भाजपला बसेल. शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली आहे खरी; मात्र ती कितपत फलद्रूप होईल याची खात्री नाही. रोजगारनिर्मिती आणि उद्योगवृद्धीसाठी केंद्र सरकारने "स्टॅण्ड अप' योजना सुरू केली. मात्र ही योजना सध्या "सीट डाउन' स्थितीत आहे, त्यामुळे लवकरच या सरकारचे "स्लीप डाउन होईल.''

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही कॉंग्रेस एकत्रित येत आहेत. ही चांगली घटना आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, 'समविचारी पक्ष एकत्रित येताहेत. त्यामध्ये केवळ दोन्ही कॉंग्रेसच नव्हे, तर इतरही पक्ष आहेत. या आघाडीचा निश्‍चित फायदा होईल.''

"मी कधीही सूड उगविला नाही'
सुडाच्या राजकारणावर विश्‍वास नाही, असे सांगून शिंदे म्हणाले, ""राजकीय वाटचालीत मला अनेकांनी दाबण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे जेव्हा संधी आली तेव्हा मी कधीही सूड उगविला नाही. राजकारणातील चढ-उतार हे सहजतेने घेण्याची सवय मी लावून घेतली, त्यामुळे त्याचा मला अनेकवेळा फायदाच झाला. जनतेने सर्वसाधारण जागेवर निवडून दिले, त्याचवेळी राखीव मतदारसंघात मात्र पराभूत केले.''

Web Title: solapur news maharashtra news modi government sushilkumar shinde politics