वाड्या-वस्त्यांचे रस्ते होणार दर्जेदार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सोलापूर - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राज्याच्या न जोडलेल्या वाड्या-वस्त्या रस्त्यांनी जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविला (दर्जोन्नती) जातो. यंदा राज्यातील पाच हजार 885 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दर्जा वाढविणार आहे. त्या काम होणाऱ्या रस्त्यांच्या लांबीला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. 

यंदा व पुढील वर्षासाठी राज्यातील किती किलोमीटरच्या रस्त्यांची दर्जोन्नती करायची याबाबतचे धोरण सरकारने निश्‍चित केले आहे. त्यानुसार जिल्हानिहाय रस्त्यांच्या किलोमीटरची लांबी निश्‍चित केली आहे. यंदा जेवढ्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत, तेवढ्याच रस्त्यांची कामे पुढील वर्षी करण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यासाठी रस्त्यांची लांबी निश्‍चित केल्यानंतर तालुक्‍याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार रस्त्याचे उद्दिष्ट निश्‍चित करायचे आहे. तालुका स्तरावचे उद्दिष्ट निश्‍चित करण्याची जबाबदारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था यांच्या कार्यकारी अभियंत्यांवर आहे. तालुक्‍याच्या क्षेत्रफळाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

नगर जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचे रस्ते 
चालू वर्षी व पुढील वर्षी रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे होणार आहेत. यंदा नगर जिल्ह्यातील 280 किलोमीटर रस्त्यांची कामे होणार आहेत. याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यांची लांबी त्याच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार निश्‍चित केली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी प्रत्येकी 218 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे होणार आहेत. 

Web Title: solapur news road