बदली अर्जांमध्ये गुरुजींची बोगसगिरी

संतोष सिरसट
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

बदल्या झाल्यानंतर होणार गोंधळ; राज्यातील तीन-चार हजार गुरुजींचा समावेश

सोलापूरः फेब्रुवारी महिन्यापासून शिक्षकांच्या बदल्यांचा विषय सरकारने काढलेल्या 27 फेब्रुवारीच्या नव्या आदेशामुळे गाजत आहे. त्यातच आता ऑनलाइन बदली अर्जामध्ये राज्यातील जवळपास तीन ते चार हजार शिक्षकांनी बोगसगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यावेळी शासनाकडून बदल्यांचे आदेश निघतील, त्यावेळी राज्यभर गोंधळाची स्थिती निर्माण होणार आहे.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा विषय खूपच क्‍लिष्ट झाला आहे. त्याचा मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाठ फिरवल्याचेही दिसून येते. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी शासनाने त्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यामध्ये अनेक निकष घालून दिले होते. त्या निकषांमध्ये बोगसगिरी केली आहे. अनेक शिक्षकांनी बोगस दाखल्यांचा आधार घेतला आहे. अनेकांनी शाळांमधील अंतरामध्ये फेरफार केला आहे. बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांची यादी जाहीर झाल्याची चर्चाही सोशल मिडियामध्ये सुरू आहे. या बोगस शिक्षकांची बदली करण्यापूर्वी त्यांना संवर्ग एक व दोनमधून वगळणे गरजेचे होते. मात्र, तसे काहीच झालेले नाही. उशिराने कार्यवाही करून काहीच उपयोग होणार नाही. या बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र शिक्षकांच्या यादीतून काढल्यास सर्व यादी प्रभावित होणार आहे. त्या शाळा कोणत्या शिक्षकांना द्याव्यात हा प्रश्‍न निर्माण होणार आहे. अनेक शिक्षकांनी या शाळा विकल्पामध्ये भरलेल्याच नाहीत. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गोंधळ होणार आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमुळे अगोदरच शासनाला टीकेचे धनी व्हावे लागले आहे. त्यातच आता नवी बोगसगिरी पुढे आल्याने याचे नेमके करावे तरी काय? असा प्रश्‍न शासनासमोर उभा राहिला आहे.

गुरुजींनी कराव्यात लेखी तक्रारी
राज्यात अनेक गुरुजींनी बोगसगिरी केल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचा परिणाम प्रामाणिक काम करणाऱ्या गुरुजींवर होणार आहे. त्यामुळे याबाबत जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रारी करण्याचे आवाहन सोशल मिडियातून केले जात आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: solapur news teacher online transfers issue