सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचा हाहाकार ! आज 212 पॉझिटिव्ह; बार्शीत 109 तर अक्‍कलकोटमध्ये 64 रुग्ण 

तात्या लांडगे
शुक्रवार, 17 जुलै 2020

ठळक बाबी... 

  • शुक्रवारी (आज) सोलापूर ग्रामीणमध्ये 212 रुग्णांची भर 
  • ग्रामीणमधील रुग्णांची संख्या पोहचली एक हजार 384 तर 41 मृत्यू 
  • आतापर्यंत 883 रुग्णांवर उपचार सुरु; 460 रुग्णांची कोरोनावर मात 
  • दोन हजार 506 संशयित होम क्‍वारंटाइन; दोन हजार 277 संशयितांना ठेवले संस्थात्मक विलगीकरणात 
  • आज एकाच दिवशी 979 अहवाल प्राप्त; आतापर्यंत आठ हजार 758 जणांची कोरोना टेस्ट 

सोलापूर : ग्रामीणमधील ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेल्यांसह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींची कोरोना ऍन्टीजेन टेस्ट करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. शुक्रवारी (ता. 17) 979 संशयितांच्या अहवालापैकी 212 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बार्शी तालुक्‍यात तब्बल 109 तर अक्‍कलकोट तालुक्‍यात 64 रुग्ण सापडले आहेत. 

शहर-जिल्ह्यात आता दररोज सरासरी दोन हजार व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. ऍन्टीजेन टेस्ट केली जात असल्याने दिवसेंदिवस सोलापूर शहर व ग्रामीणमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. त्याचा पहिलाच झटका शुक्रवारी बसला. अक्‍कलकोट तालुक्‍यात 64, बार्शी तालुक्‍यात 106, करमाळ्यात तीन, माढ्यात पाच, माळशिरसमध्ये दोन, मोहोळमध्ये 11, उत्तर सोलापुरात पाच, पंढरपूर तालुक्‍यात सहा आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात सात रुग्ण सापडले आहेत. 

गावांची यादी देणे केले बंद 
कोरोना संसर्गाची साखळी वाढू लागल्याने राज्य सरकारच्या मदतीने शहर-जिल्ह्यात ऍन्टीजेन टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावांची यादी देणेच बंद केली आहे. त्यांनी आता तालुका आरोग्याधिकाऱ्यांकडे बोट दाखविले आहे. 

ठळक बाबी... 

  • शुक्रवारी (आज) सोलापूर ग्रामीणमध्ये 212 रुग्णांची भर 
  • ग्रामीणमधील रुग्णांची संख्या पोहचली एक हजार 384 तर 41 मृत्यू 
  • आतापर्यंत 883 रुग्णांवर उपचार सुरु; 460 रुग्णांची कोरोनावर मात 
  • दोन हजार 506 संशयित होम क्‍वारंटाइन; दोन हजार 277 संशयितांना ठेवले संस्थात्मक विलगीकरणात 
  • आज एकाच दिवशी 979 अहवाल प्राप्त; आतापर्यंत आठ हजार 758 जणांची कोरोना टेस्ट 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur rural area growth in corona; today total 212 positive 109 in Barshi and 64 in Akkalkot