Vande Bharat Express : सोलापूरहून निघालेली वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यात दाखल; 'ही' आहेत वैशिष्ट्ये

Vande Bharat Express
Vande Bharat Expressesakal

सोलापूरः सोलापूर ते मुंबई या वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन आज पार पडत आहे. दुपारी सोलापूरहून निघालेली ही ट्रेन पुणे स्टेशनवर सायंकाळी दाखल झाली. यानंतर ट्रेनने पुढे तिचे निर्धारित ठिकाण मुंबईकडे प्रस्थान केले आहे.

सिद्धेश्वर एक्सप्रेस (उद्यान एक्सप्रेस) रेल्वेनंतर आता मुंबईला जाण्यासाठी सोलापूरकरांना १८ डब्यांची ‘वंदे भारत’ एक्सप्रेस असणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.०५ वाजता मुंबईला निघेल आणि दुपारी साडेबारापर्यंत मुंबईत पोहचेल. आज या ट्रेनची ट्रायल रन झाली आहे.

Vande Bharat Express
Nagpur MLC Election : नागपूरमध्येच भाजपला धक्का! सुधाकर अडबाले यांचा विजय

सोलापूर- मुंबई आणि मुंबई- शिर्डी (साईनगर) अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या १० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. परंतु, त्यावेळी ते मुंबईत येणार की दिल्लीतून ऑनलाइन शुभारंभ करणार, याबतीत अजून काही ठरलेले नाही.

हेही वाचाः 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

दरम्यान, आज वंदे भारत एक्स्प्रेसला पाहण्यासाठी अनेकांनी पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेन चे उद्घाटन होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते सोलापूर दरम्यान ताशी 110 किमी वेगाने धावणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com