उजनीच्या पाण्यावर तरंगता सौरप्रकल्प

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - जमिनीवरील उपलब्ध नैसर्गिक स्रोतांच्या वापरावर मर्यादा पाहता राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या तलाव, धरणांच्या पाण्यावर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे. याचाच भाग म्हणून राज्य सरकारने उजनी धरणाच्या पाण्यावर १००० मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. 

यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने महावितरण कंपनीने सदर प्रकल्पासाठी स्वारस्याचे प्रकटीकरण मागविले होते. सदर स्वारस्य प्रकटीकरणद्वारे मिळालेल्या सूचनांचा विचार करण्यासाठी, तसेच तरंगत सौरऊर्जा प्रकल्पाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत या क्षेत्रातील मर्यादित अनुभवाचा विचार करून तरंगता सौरप्रकल्प स्थापित करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व बाबी निश्‍चित करण्यासाठी शासनातर्फे संचालक (वाणिज्य), महावितरण, यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. 

सदर समितीने २७ सप्टेंबर रोजी शासनास अहवाल दिला होता. तसेच १८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने या प्रकल्पास दिलेल्या मान्यता व समितीच्या शिफारसीनुसार महावितरण कंपनी २४ डिसेंबर रोजी उजनी जलाशयावर एक हजार मेगावॉट तरंगता सौरऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदीबाबत निविदा प्रकाशित केल्या आहेत. त्यासाठी समितीने उजनी धरण येथील जलाशयावर प्रत्येकी १०० मेगावॉटच्या दहा जागा निश्‍चित केल्या आहेत. 

अधिक कार्यक्षमता
तरंगते सौरप्रकल्प उभारल्यानंतर एका वर्षात कमीतकमी एक टीएमसी पाण्याचे बाष्पीकरण टाळून, पाण्याची बचत करता येणार आहे. तसेच जमिनीवर उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या तुलनेत तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यक्षमता सहा ते सात टक्‍क्‍यांनी जास्त अपेक्षित आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही उजनी धरणालगतच्या शेतकऱ्यांना दिवसा उपलब्ध करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

Web Title: Solar Project on Ujani Water