भाजप आमदार म्हणाले सैनिक चंदू हा 'भगोडा'

गुरुवार, 15 मार्च 2018

पुणेः पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्यावरून स्थानिक पातळीवर राजकारण केले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर टीका करताना भगोड्या सैनिक चंदूला परत आणले असल्याचे वक्तव्य केले आहे.

भगोड्या सैनिक चंदूला आणले...
आमदार गोटे यांनी डॉ. भामरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, की संरक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी काय काम केले तर भगोड्या सैनिक चंदूला परत आणले, कार्य काय तर महापालिकेची निवडणूक असल्याने मुख्यमंत्र्यांकडून दहा कोटींचा निधी आणला.

चंदू भगोडा कसा?
चंदू चव्हाण भगोडा असता तर त्याला सैन्य दलात ठेवले असते का? आमदार गोटे यांनी राजकीय वादामध्ये जवानाला ओढले असून, गोटे यांनी जवानाचा अवमान केला आहे. यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, असे चंदू चव्हाण याचे आजोबा पी. डी. पाटील (आईचे वडील) यांनी म्हटले आहे.

संघटना आंदोलनाच्या तयारीत...
जवान चंदू चव्हाण यांना भगोडा म्हणून जवानाचा अवमान केला आहे. यामुळे आमदार गोटे यांचा निषेध करतानाच जिल्ह्यातील काही संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत.

दरम्यान, भारतीय जवान चंदू चव्हाण 29 सप्टेंबर 2016 रोजी वाट चुकले आणि पाकिस्तान हद्दीत पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात अडकले. चव्हाण यांची सुटका होण्यासाठी सरकारसह देशातील अनेकांनी आपापल्या परीने पाठपुरावा केला आणि 21 जानेवारी 2017 रोजी ते सहीसलामत भारतात परतले होते. चंदू यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होते. चव्हाण 2012 मध्ये सैन्यात भरती झाले आहेत. आई-वडीलांचे छत्र लहानपणीच हरवलेले. एक भाऊ व एक बहिण. भाऊ भूषण चव्हाण हे सुद्धा लष्करात आहेत. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तिघा भावडांचे आजी-आजोबांनी (आईचे आई-वडील) पालन पोषण केले. शालेय शिक्षण घेत असताना परिस्थितीमुळे चहाच्या हॉटेलमधील कामापासून ते हमालीपर्यंतचे काम चव्हाण यांनी केले. पराकोटीच्या हालअपेष्टांनी कष्ट, दुःख सहन करण्याची ताकद दिली. आलेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. 'या अनुभवाचा सर्वांचा फायदा त्यांना पाकिस्तानच्या ताब्यात असताना नक्कीच झाला,' असे चंदू यांनी सांगितले होते.

चंदू यांची सुटका होण्यासाठी संपूर्ण देशाने प्रार्थना केली होती. शिवाय, त्यांच्या सुटकेकडे लक्ष लागले होते. परंतु, त्यांच्या सुटकेनंतर आता स्थानिक पातळीवर राजकारण केले जात आहे. या नव्या वक्तव्यामुळे आमदार गोटे यांच्यासहित भाजपलाही कठोर टीकेचे लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्याः

Web Title: soldier chandu chavan bjp mla anil gote politics dr subhash bhamre