जवान चंदू चव्हाण यांचे जंतर-मंतरवर आमरण उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

पाकिस्तानच्या तावडीमधून सहीसलामत सुटून भारतात परतलेले भारतीय जवान चंदू चव्हाण हे नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर 2 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करणार आहेत, अशी माहिती चंदू चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

पुणे : पाकिस्तानच्या तावडीमधून सहीसलामत सुटून भारतात परतलेले भारतीय जवान चंदू चव्हाण हे नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर 2 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करणार आहेत, अशी माहिती चंदू चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

चंदू चव्हाण म्हणाले, 'पाकिस्तानातून सुटून आल्यानंतर भारतीय लष्कराची माझ्याशी असलेली वागणूक, वर्तन बदलले. त्यामुळे मी व्यथित झालो. तीन वर्षांपासून मी या समस्येला सामोरा जात आहे. लष्करातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला. पाकिस्तानमधून परतल्यापासून सतत चौकशीला सामोरा जात असून, 90 दिवसांची शिक्षा भोगली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. मोबाईल व ओळखपत्र जप्त केले आहे. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसत आहे. माझ्यावर झालेल्या कारवाईची सरकारने सीबीआयने चौकशी करावी व मला न्याय मिळवून द्यावा.'

दरम्यान, चंदू चव्हाण हे भारतीय नियंत्रण सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेले होते. पाकिस्तानच्या तावडीत 3 महिने 21 दिवस होते. त्यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. केंद्र सरकारने मोठे प्रयत्न करतत्यांना भारतात आणले होते. चंदू भारतात परतले त्यावेळी देशवासीयांनी मोठा जल्लोष केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soldier chandu chavan hunger strike at jantar mantar delhi