कोंडी सोडविण्यासाठी शिरूर रस्ता सहापदरी करा 

कोंडी सोडविण्यासाठी शिरूर रस्ता सहापदरी करा 

शिरूर - पुणे - शिरूर या मार्गाचा विकास केंद्राच्या माध्यमातून होवो किंवा राज्याच्या; पण रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले पाहिजे. वाढत्या वाहतुकीचा गांभीर्याने विचार करून हा रस्ता सहापदरी झाला पाहिजे, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  

पुणे - शिरूर रस्ता हायब्रीड ॲन्युइटीअंतर्गत विकसित करण्याचे काम राज्य सरकारने मंजूर केले असतानाच; केंद्राने राष्ट्रीय महामार्गात या रस्त्याचा समावेश केला. ही स्थिती असली; तरी तातडीने या रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘‘चारऐवजी हा रस्ता सहा पदरी रस्ता झाला पाहिजे. कोरेगाव भीमा, शिक्रापूर, वाघोली येथे उड्डाण पूल केले तरच वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. त्यादृष्टीने, या विकास आराखड्यात नियोजन झाले पाहिजे. पूर्वी आपण तास - दीड तासात शिरूरहून पुण्याला पोचायचो. आता तीन - तीन तास लागूनही वेळेत पोचता येत नाही.’’

गेल्या दोन - तीन वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबत, रुंदीकरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पण वाहतूक समस्येतून सुटका होताना दिसत नाही, अशी टिपणी करून पवार म्हणाले, ‘‘भविष्यात दळणवळण आणखी वाढणार आहे. त्यासाठी रस्ता रुंद करणे हा एकमेव मार्ग असून, त्यासाठी सर्वसहमतीने, समन्वयाने हा विषय मार्गी लागला पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com