Som Yag Yadnya 2023 : म्हापशात उद्यापासून महासोमयाग

विश्वकल्याणार्थ ‘गोमन्तक-सकाळ’ माध्यम समूहाचा पुढाकार
Som Yag Yadnya 2023 from tomorrow in Mhapashat sakal Gomantak
Som Yag Yadnya 2023 from tomorrow in Mhapashat sakal Gomantak sakal

म्हापसा : सकारात्मक ऊर्जा निर्मिती, वातावरण शुद्धी, मनशांती आणि आध्यात्मिक समाधानासाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या वतीने अग्निष्टोम महासोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वकल्याणार्थ आयोजित या यागाचा प्रारंभ उद्या, रविवारी (ता. ५) रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या सहा दिवस चालणाऱ्या यागाची सांगता १० फेब्रुवारी रोजी सकाळी अवघृत स्नानाने होईल.

दररोज सकाळी सुरू होणाऱ्या या यागाची सांगता दररोज संध्याकाळी सातपर्यंत होईल. विशेष म्हणजे या यागाच्या परिणामांचे शास्त्रीय कसोटीवर परीक्षण देखील करण्यात येईल. म्हापशाचे ग्रामपुरोहित सोमयाजी सुहोता दीपक दीक्षित आपटे हे या सोमयागाचे यजमानपद भूषवणार आहेत. सोमयागाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी दुपारी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे.

भगवान परशुरामांची भूमी असा लौकिक असणाऱ्या गोव्यात यज्ञाची परंपरा अतिशय प्राचीन आहे. याच परंपरेचे पुनरुत्थान करण्यासाठी तसेच यज्ञसंस्कृतीचे जतन करण्यासाठी या यागाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी या यज्ञाकार्यास उपस्थित राहून यज्ञनारायणाच्या कृपाशीर्वादास पात्र व्हावे, असे आवाहन ‘गोमन्तक-सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने केले आहे.

पादुका दर्शनासाठी यज्ञस्थळी..

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरुमंदिर (श्री बाळप्पा मठ ) या गुरुपीठवरून परमसद्‍गुरू श्री गजानन महाराज (शिवपुरी) यांच्या चैतन्य पादुकांचे आगमन यज्ञ स्थळावर होणार आहे. परमसद्‍गुरूंनी या गुरुपीठावरून जगाच्या कल्याणासाठी घरोघरी अग्निहोत्राचा संदेश दिला, आज जवळपास ६५ पेक्षा जास्त देशात परमसद्‍गुरूंचे अनुयायी अग्निहोत्र करतात आणि तोच संदेश घेऊन या पवित्र गुरुपीठावरून चैतन्य पादुकांची पालखी गोव्यात येणार आहे. जास्तीतजास्त भाविकांनी या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुपिठातर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com