छगन भुजबळांच्या प्रवेशाला सेनेत तीव्र विरोध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

छगन भुजबळ हे भ्रष्टाचाराचा आरोप असणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना प्रवेश देवू नये अशी सेनेतील काही बड्यांची भूमिका आहे.

मुंबई : छगन भुजबळ हे भ्रष्टाचाराचा आरोप असणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना प्रवेश देवू नये अशी सेनेतील काही बड्यांची भूमिका आहे. सेनेला प्रतिसाद देणारे वातावरण असताना अचानक टिका ओढवणारे काही करू नका अशी विनवणी मातोश्रीला करण्यात आली.

संबंधित वृत्त
 

आदित्य ठाकरे यांनी ठाकरे घराण्याची परंपरा कायम ठेवत सत्तापद न घेण्याचे ठरवल्यास सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होईल. त्यात नव्या स्पर्धकाची भर नको यासाठी भुजबळांना विरोध होण्याची शक्यता होती.

आपण कुठेही जाणार नाही असे भुजबळांनी स्पष्ट केल्याने प्रश्न संपला. मात्र तुरुंगात जावून आलेले नेते कितीही प्रभावी अन एकेकाळी आमचेच होते तरी त्यांना घेण्याचा प्रश्न नव्हता असे मातोश्रीच्या जवळ असलेल्या नेत्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some of the Shiv Sena leaders opposed to Chhagan Bhujbal