अतिरिक्‍त आयकर आयुक्‍तांचा मुलगा गिरवतोय स्वावलंबनाचे धडे

अतिरिक्‍त आयकर आयुक्‍तांचा मुलगा गिरवतोय स्वावलंबनाचे धडे

औरंगाबाद : वडील क्‍लासवन ऑफिसर असल्याचा गर्व मुलाच्या मनात उत्पन्न होऊ नये तसेच, शालेय वयातच जीवनावश्‍यक कौशल्य आत्मसात व्हावीत, यासाठी औरंगाबादच्या अतिरिक्‍त आयकर आयुक्‍त संदीपकुमार साळुंखे यांचा मुलगा "निर्भय'पणे सामोरे जातोय. चहा बनविण्यापासून स्वत:ची कपडे, भांडी धुण्यापर्यंत त्याला स्वावलंबनाचे धडे मिळत आहेत. निर्भयचे प्रयत्न आणि पालकांचा प्रयोग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

संदीपकुमार हे 2004च्या बॅचचे आयआरएस आहेत. ते मुळचे मारवड (ता. अंमळनेर, जि. जळगाव) येथील असून त्यांचे गावांमध्येही सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. ते नोकरीनिमित्त औरंगाबादेत आहेत. त्यांचा मुलगा निर्भयने नाथ व्हॅली स्कुलमध्ये पाचवीची परीक्षा दिलीय. वीस दिवसापुर्वी सुटी लागली असून पालकांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. चहा बनविणे, कपडे, भांडी आणि टॉयलेट धुणे, कपडे शिवणे याप्रकारच्या गोष्टी त्याला शिकवल्या जात आहेत. आज शिकलेली गोष्ट सवयीचा भाग बनवायला लावून करुन रोज नवे शिकवले जाते. 

अशी आहे फेसबुक पोस्ट 
सुटीच्या दिवसात निर्भयला मुलभूत गोष्टी शिकवत आहे. महिनाभर भांडी धुवून सातशे रुपये मिळतात, ते पैसे आपण कसे खर्च करावेत, याची जाणीव होते. कंबर, पाठ कशी भरुन येते, यावरुन घरातील महिलांच्या कष्टाची किंमत कळावी. कुठलेही काम कमीपणाचे नाही. अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दंभ, अहंकार होऊ नये, यात कोणतीही सक्‍ती करण्यात येत नसून निर्भय हे आनंदाने घेत आहे. 

वडिलांची पोस्ट व्हायरल 
आठवड्यापूर्वी म्हणजेच 23 एप्रिलला फेसबुवर केलेली पोस्ट एक हजार जणांनी शेअर केली असून सव्वातीन हजार लाईक्‍स्‌ आणि साडेतीनशे कमेंट मिळाल्या असून ही स्टोरी प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याचे अनुकरण होत असून लोकांचे सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याचे निर्भयच्या वडिलांनी सांगितले. स्वयंपाक न करणाऱ्या मुली पोस्ट वाचून स्वयंपाक करायला सुरवात केल्याचे पालक संदीपकुमार यांना कळवित आहेत. 


मुलाला देत असलेले स्वावलंबनाचे धडे फेसबुवर पोस्ट करत असल्याने त्यावर साधक बाधक चर्चा होत आहे. मुलाला पुढे चालून अशा गोष्टी करायला लागणार नसल्या तरी, जीवनावश्‍यक कौशल्य देणे मी क्रमप्राप्त समजतो, अशी प्रतिक्रीया संदीपकुमार साळुंखे यांनी सकाळशी बोलताना दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com