जन्मदात्यांना दिले नारळपाण्यातून विष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

लातूर : जन्मदात्या आई- वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न मुलाने केला. यात वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आईची प्रकृती अद्याप गंभीर आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस स्थानकामध्ये मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मुलाला शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. 

मोरेनगर भागातील राहणाऱ्या साधुराम कोटंबे (वय 72) व गयाबाई कोटंबे यांना त्यांचा मुलगा ज्ञानदीप (वय 29) याने नारळपाणी आणून दिले. ते पिताना नारळपाणी कडवट लागत आहे, असे आई- वडिलांनी सांगितले. मात्र मुलाने नारळपाण्याची चव अशीच असते, असे उत्तर दिले. आईने थोडे पाणी पिऊन ते बाजूला ठेवले; मात्र वडिलांनी पूर्ण पिऊन टाकले. थोड्याच वेळाने वडिलांची प्रकृती बिघडली. म्हणून कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. आईच्या जबाबावरून पोलिसांनी मुलाला शुक्रवारी (ता. 15) रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्यानंतर मालमत्तेच्या वाटणीवरून मुलाने हे कृत्य केल्याचे सिद्ध झाले. कोटंबे हे निवृत्त प्राचार्य होते. 

Web Title: son give poison in coconut his father