शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी सोनी टीव्हीची माफी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सोनी वाहिनीने केलेल्या या चुकीमुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. तसेच ट्विटवर #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅगही प्रचंड ट्रेंड झाला होता. आता या प्रकरणात वाहिनीने झुकतं माप घेत जनतेची माफी मागितली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्या दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा  सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते. आज अखेर सोनी वाहिनीने या चुकीबद्दल माफी मागितली आहे. 

#Boycott_KBC_SonyTv महाराजांचा एकेरी उल्लेख; सोनीविरुद्ध रस्त्यावर उतरत निदर्शने

सोनी वाहिनीने केलेल्या या चुकीमुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. तसेच ट्विटवर #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅगही प्रचंड ट्रेंड झाला होता. आता या प्रकरणात वाहिनीने झुकतं माप घेत जनतेची माफी मागितली आहे.  
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आज दुपारी 12 वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करणार होती. 

Image may contain: 1 person, text

काय आहे प्रकरण?
बुधवारी कार्यक्रमादरम्यान गुजरातच्या स्पर्धकासाठी एक प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न असा होता. ''यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औंरगजेबचा समकालीन होता?'' या प्रश्नासाठी देण्यात आलेले चार पर्याय असे होते-
1. महाराणा प्रताप
2. राणा सांगा
3.  महाराजा रणजीत सिंह 
4. शिवाजी

यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तुम्ही औरंगजेबच्या नावापुढे मुघल सम्राट अशी पद्वी लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा एकेरी उल्लेख का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sony Tv apologizes for disrespecting Shivaji Maharaj in Kaun Banega Karodpati