सुखदायक! राज्यातील आतापर्यंत एवढे रुग्ण झाले बरे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

देशातील ३१ टक्के रुग्ण महाराष्ट्रात
देशातील ४ लाख ४१ हजार ९३६ रुग्णांची नोंद मंगळवारी दुपारी तीनवाजेपर्यंत केंद्र सरकारकडे झाली होती. त्यापैकी ३१ टक्के (एक लाख ३५ हजार ७९६) रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल दिल्लीमध्ये ६२ हजार ६५५ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे जाहीर करण्यात आली.

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले राज्यातील निम्मे रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एक लाख ३५ हजार ८०० रुग्णांपैकी ६७ हजार ७४० जण (४९.८८ टक्के) बरे झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळला. त्यानंतर मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे निदान होऊ लागले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण, आता हे चित्र बदलत असल्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसते.

Image may contain: text

आता कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे. राज्यात सुमारे ५० टक्के रुग्ण कोरोनामुक्त आहेत. तर, ४५ टक्के (६१ हजार ७९३) रुग्णांवर राज्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधून उपचार सुरू आहेत. मात्र, सहा हजार २६३ रुग्णांचा यात सोमवारपर्यंत मृत्यू झाला आहे.

विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या! यंदा अकरावी प्रवेशप्रक्रियेतील बदल जाणून घ्या; वाचा सविस्तर

प्रयोगशाळांची संख्या एकवरून १०४ वर
राज्यात मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या ससंर्गाचे निदान करणारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही एकमेव प्रयोगशाळा होती. गेल्या चार महिन्यांमध्ये राज्यात १०४ प्रयोगशाळांचे जाळे निर्माण करण्यात आले. त्यात ६१ प्रयोगशाळा सरकारी असून, उर्वरित ४३ खासगी आहेत.

केवळ ४०० ते ४५० रुपयांत कोरोना तपासणी;  ‘अँन्टी जेन’ चाचणीला ‘आयसीएमआर’ची परवानगी 

मुंबई, ठाणे आणि पुण्यात उद्रेक
राज्यातील ८३ टक्के कोरोनाबाधितांवर सध्या मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन शहरांमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४८ टक्के (२९ हजार ७२०) रुग्ण एकट्या मुंबईत असून, त्या पाठोपाठ ठाणे १४ हजार ५५५ (२४ टक्के) आणि पुण्यात सात हजार ७१ (११ टक्के) रुग्ण उपचारांसाठी दाखल आहेत. दाट लोकसंख्येची ही शहरे असल्याने येथे कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. उर्वरित ३२ जिल्ह्यांमधील १७ टक्के रुग्ण आढळल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे नोंदण्यात आले आहे.

300 युनिटपर्यंत वीजबिले माफ करा! भाजपची राज्य सरकारकडे मागणी

प्रयोगशाळांमधून आतापर्यंत सात लाख ८७ हजार ४१९ रुग्णांचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी एक लाख ३५ हजार ७९६ (१७.२४ टक्के) रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळांमधील अहवालातून स्पष्ट झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soothing! There have been so many patients in the state so far