ठरलं ! काँग्रेसचा अध्यक्ष तर उपाध्यक्ष...

Speaker of Assembly from Congress party says Prafful patel
Speaker of Assembly from Congress party says Prafful patel

मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होताना दिसत नव्हते परंतु आता जवळपास सर्व मुद्यांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद तर उपमुख्यामंत्रिपद राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती पटेल यांनी दिली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्या एकूण मुख्यमंत्र्यांसोबत आणखी सहाजण म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन-दोन नेते शपथ घेणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 'या' दिग्गज व्यक्तींची राहणार उपस्थिती 

तीनही पक्षाचा निर्णय झाला असून अध्यक्षासाठी तिनही पक्षात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकच असणार आहे आणि तो राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री राहील अशी माहितीही पटेल यांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com