बजेट अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात होणार विधानसभा अध्यक्षाची निवड

Maharashtra Legislative Assembly
Maharashtra Legislative Assembly sakal media

मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा ताटकळत आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनामध्येच ही निवडणूक पार पाडली जावी, यासाठी सरकारचा प्रयत्न होता. मात्र, नियमांमध्ये करण्यात आलेले बदल असंवैधानिक ठरवत राज्यपालांनी त्यास मंजूरी दिली नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हट्ट धरूनही गेल्या तीन अधिवेशनांत या पदाची निवडणूक टळल्यानंतर काँग्रेस नेतृत्व सावध झालं आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात निवडणूक घेण्याची तयारी पक्षाने केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज स्पष्ट केलंय. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नव्या अध्यक्षांचे नाव ठरणार असल्याचंही पटोले यांनी संगितलंय. (Maharashtra Assembly)

Maharashtra Legislative Assembly
गुंड गजा मारणेची पत्नी राष्ट्रवादीत; भाजपचे १५ नगरसेवकही वाटेवर?

महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यापासून ते रिक्त आहे. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या हालचाली काँग्रेसकडून झाल्या. या काळातील अधिवेशनांत निवडणूक होणार असल्याचे पटोले यांनी तीनदा स्पष्ट केले होते. मात्र आधी कोरोना, हिवाळी अधिवेशनात निवडणुकीच्या प्रक्रियेतील बदलामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांतील मतभेद, ठाकरे सरकार विरोधकांमधील संघर्षातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टळल्याचे दिसले. त्यात काँग्रेसमधील नेत्यांचा वादही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ३ मार्चपासून होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या आठवड्यातच निवडणूक घेण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक ९ मार्च रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Legislative Assembly
ईडीच्या चौकशीला घाबरुन राणे भाजपला शरण; विनायक राऊत बरसले

मंत्रिमंडळात बदलाचे संकेत

सरकारमध्ये जे काही घडत आहेत; त्यात १० मार्चनंतर बदल होईल, असे सांगून पटोले यांनी एकप्रकारे मंत्रिमंडळात बदलाचे संकेतच दिले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हाच बदल असल्याचा खुलासा पटोले यांनी केला. मी लोकांसाठी बदल होईल, असे सांगितले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मला मंत्रीपद मिळावे, यासाठी आग्रह नाही. कोणाला काय द्यायचे, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, अशा सूचक शब्दांत पटोले यांनी मंत्रीपदाबाबत वक्तव्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com