
Ramdas Kadam: सुभाष देसाईंवर बोलताना रामदास कदमांची जीभ घसरली; म्हणाले तो देसाई***
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये आज सभा पार पडली. येथे शिवसेनेचा भगवा झंझावात उभा करण्यासाठी आज शहरातील गोळीबार मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमिवर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले, उद्धवजी बाळासाहेब म्हणाले होते, ज्या वेळी मला काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ येईल त्यावेळी मी शिवसेना नावाचं दुकान बंद करीन. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी उद्धवजी तुम्ही गद्दारी का केली? २००९ मध्ये मला गुहागर मधून तिकीट दिलं. मी दापोली मधून मागीतलं होतं. तिथं आपल्याचं एका नेत्याला सांगून मला पाडलं.
कशासाठी तर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत म्हणून. राज्याचा विधानसभेचा विरोधीपक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो. कदाचीत शिवसेना प्रमुखानी मला मुख्यमंत्री मला केलं असतं. पण मी मुख्यमंत्री व्हायला नको म्हणून तुम्ही मला २००९ मध्ये पाडलत. असा गंभीर आरोप देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
तर सुभाष देसाई यांच्यावर बोलताना रामदास कदम यांची जिभ घसरली. ते म्हणाले योगेश कदमला पाडण्यासाठी सुभाष देसाई** शेळी मेंढी** सगळ्यात पुढं असायचा. तर पुढं म्हणाले, बाळासाहेब ठाकरे रामदास कदम सारखे वाघ पाळायचे आणि तुम्ही सुभाष देसाई सारख्या शेळ्या मेढ्यांना पाळताय हा तुमच्यामधील फरक आहे. अशा शब्दा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी टीका केली.