शेतकऱ्यांच्या विधवांसाठी हवे विशेष धोरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा शिफारसी राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.

नागपूर येथे २२ व २३ फेब्रुवारी २०१८ रोजी व औरंगाबाद येथे २६ व २७ मार्च २०१८ रोजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांची सुरक्षितता या विषयावरील दोनदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. महिलांनी स्वतः येणाऱ्या अडचणी मांडल्या, त्याबाबत चर्चा केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी उपाययोजना, शिफारशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केल्या आहेत.

विविध उपाययोजनांच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांच्या समस्यांचे निराकरण करून या महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देता येणे शक्‍य आहे.
- विजया रहाटकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

Web Title: Special policy for the widows of the farmers