आई आणि पवार साहेबांचे आशिर्वाद घेत धनंजय मुंडे म्हणाले...

dhan.jpg
dhan.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुडेंचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे, आपले वडील दिवंगत पंडितअण्णा मुंडे, संतश्रेष्ठ भगवान बाबा व मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन केली नव्या राजकीय जीवनाची सुरवात केली आहे.

दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचा मंत्री व्हाया विधानपरिषद विरोधी पक्षनेता असा लांबलचक प्रवास मुडेंनी केला आहे.

शपथविधीला जाण्यापूर्वी धनंजय यांनी आपल्या मातोश्रींचे दर्शन घेतले. महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या महाविकासआघाडीत मंत्री म्हणून काम करायची ही पहिलीच संधी आहे. अनेक वर्षे सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढा देत, संघर्ष करत विधानपरिषद, विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपद व आज विधानसभेत पोहचल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळती आहे. याबद्दल मी माध्यमांद्वारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे आभार व्यक्त करतो.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com