तीन महिन्यांत विशेष लसीकरण मोहीम - डॉ. दीपक सावंत

Dr.-Deepak-Sawant
Dr.-Deepak-Sawant

मुंबई - नियमित लसीकरण मोहिमेव्यतिरिक्त मिशन इंद्रधनुष्य अभियानाअंतर्गत 2018 अखेर 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या संदर्भात आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी संवाद साधला असता, ऑक्‍टोबर ते डिसेंबर महिन्यात विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

सहा जिल्ह्यांमध्ये ऑक्‍टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांतील प्रत्येक 22 तारखेला दोन वर्षांच्या आतील बालके आणि गरोदर मातांना विशेष लसीकरण करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी या वेळी सांगितले. या विशेष लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत आढावा आज घेण्यात आला. केंद्र शासनाच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येते. राज्यातील जळगाव, धुळे, सांगली, कोल्हापूर, पालघर, रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये नियमित लसीकरणाव्यतिरिक्त राबविण्यात येते. दोन वर्षांच्या आतील बालके, गरोदर मातांना सर्व प्रकारच्या लसी याअंतर्गत देण्यात येतात. 2018 अखेर देशात मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्याने संपूर्ण देशात ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्राने लसीकरणाचे नियोजन केले असून, तीनही महिन्यांतील प्रत्येक 22 तारखेला ती राबविण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com