Vidhan Sabha 2019 : दिव्यांग करणार 106 मतदान केंद्रांचे संचालन

Vidhansabha-2019
Vidhansabha-2019

मुंबई : यंदा पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 106 मतदान केंद्रांवर दिव्यांगांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 8 मतदान केंद्रे ही लातूर शहर मतदारसंघातील असून त्या खालोखाल उदगीर मतदारसंघात 6 मतदान केंद्रे ही दिव्यांग संचालित असतील.

निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तींना निवडणूकविषयक कामे देऊ नये, असे निर्देश दिले असले तरी दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे सर्व कामे करू शकतात, ही बाब सिद्ध करण्यासाठी निवडणूकविषयक कामात त्यांना सहभागी करून घेतले जात आहे.

स्वयंसेवकांची होणार मदत

मतदान केंद्रांवर वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या शारीरिक मर्यादा, विकलांगतेमुळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडथळे येत असतात. त्यामुळे त्यांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

शाळ-महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी), नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच नागरी संरक्षण विभाग, आपत्त्कालीन परिस्थितीत काम करणारे स्वयंसेवक आणि गृहरक्षक दल यांचीदेखील मदतनीस, स्वयंसेवक म्हणून निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर दिव्यांग आल्यानंतर त्यांना वाहनापासून आणणे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत त्या वाहनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या स्वयंसेवकांवर असणार आहे. तसेच मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून देणे, गरज भासल्यास प्रसाधनगृह आणि प्रथमोपचार यांची उपलब्धता करून देण्याचे काम हे स्वयंसेवक करतील. या अनुषंगाने या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com