अध्यात्म व संत परंपरा भारताचे मूळ - भागवत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

शिर्डी - ""भारत आक्रमक देश नाही. सेवाभाव व परोपकार शिकविणारे अध्यात्म व संत परंपरा हे या देशाचे मूळ आहे. ज्यांना या देशाचे उत्थान घडवायचे आहे, त्यांना या मुळापाशी जावेच लागेल. संघात आम्ही मंत्र आणि आरती करीत नाही, तर मैदानात खेळ खेळून देशभक्ती व सेवाभाव जागृत करतो. येथील हरिनाम सप्ताहात सेवाभाव व संत परंपरेची मुळे आहेत. त्यामुळे येथून नवी ऊर्जा व सेवाभावाची शिदोरी घेण्यासाठी मी आलो आहे,'' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले. 

साईसमाधी शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सद्‌गुरू गंगागीर महाराज हरिनाम सप्ताहात आज भागवत यांनी सहभाग घेऊन भाविकांशी संवाद साधला. या वेळी महंत रामगिरी महाराज, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, प्रांत संघचालक नानाजी जाधव, खासदार सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते. 

सर्वांनी संत शिकवणुकीची वाट धरली, तर जगातील पर्यावरणाचे प्रश्‍न व भांडणे मिटतील. अमेरिकेला जगाचा व्यापार ताब्यात घेण्यासाठी आणि चीनला शेजारचे देश ताब्यात घेण्यासाठी, इतरांना धाक दाखविण्यासाठी महासत्ता व्हायचे असते. भारताने आपल्याला भगवान बुद्ध दिले हे चीन विसरतो. भारत महासत्ता झाला, तर इतरांना प्रेम व अध्यात्म देईल. 
- मोहन भागवत, सरसंघचालक 

Web Title: Spirituality and Saints tradition is the origin of India says Bhagwat