पिस्तूल आणण्यात पांगारकरचा सहभाग

अनिश पाटील
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई - नालासोपारा येथून स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभरातून पिस्तुलांचा साठा पकडला. परराज्यांतून आलेला हा पिस्तुलांचा साठा आणण्यासाठी माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर तेथे गेल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. एटीएसच्या मदतीने कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने पांगारकरची नुकतीच चौकशी केली होती.

पांगारकर हा गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे याच्या संपर्कात होता. पांगारकरने शस्त्रसामग्री जमा करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. ही शस्त्रे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून आणण्यात आली होती. त्यासाठी पांगारकर तेथे गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी आरोपींनी वापरलेल्या दुचाकीबाबतही पांगारकरचा सहभाग पुढे आला आहे.

आरोपींना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात आलेल्या बंदुका ठेवण्याची जबाबदारी नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुधन्वा गोंधळेकरवर होती. त्याच्या चौकशीनंतर पिस्तुलांचा मोठा साठा पकडण्यात एटीएसला यश आले. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश हत्येत वापरण्यात आलेली शस्त्रे अमोल काळेकडील असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गौरी लंकेश यांच्या हत्येवेळी सुधन्वाशी साधर्म्य असलेली व्यक्ती घटनास्थळी असल्याचे तेथील सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. त्यामुळे कर्नाटक एसआयटीने त्याबाबतही गोंधळेकरकडे चौकशी केली. 

Web Title: Srikant Pangarkar involvement in Pistol brought