यशाची गुरुकिल्ली

SSC-Education
SSC-Education

तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन; सर्व विषयांच्या कृतिपत्रिकांद्वारे विद्यार्थ्यांकडून सराव
पुणे - दहावीची परीक्षा हा शालेय परीक्षेचा अंतिम टप्पा. या परीक्षेवर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्‍चित होते. त्यामुळेच दहावीचा बदललेला अभ्यासक्रम व मूल्यमापनाची पद्धत डोळ्यांसमोर ठेवून ‘सकाळ’तर्फे ‘सकाळ दहावी अभ्यासमाला’ गुरुवारपासून (ता. ५) दररोज प्रसिद्ध होणार आहे. 
दहावीच्या सर्व दहा विषयांना स्थान असणारी ही अभ्यासमाला १८० दिवस चालणार आहे. प्रत्येक दिवशीच्या सदरात त्या-त्या विषयातील महत्त्वाच्या संकल्पना यात समजावून सांगण्यात येतील, तसेच त्यावर आधारित कृतिपत्रिका देण्यात येईल.

प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून सोप्या भाषेत लेखांची मांडणी केलेली असेल. सुरवातीच्या भागांत अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांचे बदललेले स्वरूप, मूल्यमापनाची पद्धत याची माहिती दिली जाईल. अभ्यासमालेचे स्वरूप आणि वेगवेगळ्या विषयांची तोंडओळखही करून देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रत्येक विषयाच्या कृतिपत्रिका सोडविण्यासाठी देऊन दुसऱ्या दिवशी प्रश्‍नांची उत्तरेही दिली जातील. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वर्षभराच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, वेळेचे काटेकोरपणे नियोजन कसे करावे, याविषयीही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. नव्या ज्ञानरचनावादी गुणांकन पद्धतीमध्ये शिकण्यासाठी चर्चा करणे, अवांतर वाचन, इंटरनेटचा वापर, क्षेत्रभेट, स्वमत, स्वकल्पना, स्वानुभव यांतून व्यक्त होणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भात या अभ्यासमालेत मार्गदर्शन केले जाईल.  परीक्षेतील गुण वाढवण्यासाठी काय करावे, याबद्दलच्या टिप्स तज्ज्ञ शिक्षक या अभ्यासमालेतून विद्यार्थ्यांना देतील. सोमवार ते शनिवार प्रसिद्ध होणाऱ्या या स्वयंअध्ययनावर आधारित लेखमालेतून विद्यार्थी, शिक्षक, तसेच पालकांच्या शंकांचे निरसन होऊ शकेल. 

‘सकाळ’ची अभ्यासमाला कशासाठी?
    या वर्षीपासून दहावीच्या अभ्यासक्रमात, पाठ्यपुस्तकांत व मूल्यमापन पद्धतीत बदल.
    बदललेल्या अभ्यासक्रमातील ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन समजून घेण्यासाठी.
    दहावीला प्रश्‍नपत्रिकांऐवजी आकलन, उपयोजन, कौशल्यावर आधारित असलेली कृतिपत्रिका सोडविण्यासाठी.
    विचारशक्ती विकसित होण्यासाठी, निर्णयक्षमता वाढविण्यासाठी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com