दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी (ता. २९) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ‘www.mahresult.nic.in’ या संकेतस्थळाद्वारे विषयनिहाय गुण समजणार आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्टमध्ये ही परीक्षा झाली. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची स्वतंत्र फेरी होणार आहे.

विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी  : ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर
उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळविण्यासाठी : ३० ऑगस्ट ते १८ सप्टेंबर
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी : उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांच्या आत अर्ज करणे अपेक्षित

दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एटीकेटी लागू असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची स्वतंत्र फेरी लवकरच जाहीर केली जाणार आहे. प्रवेशाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य फेरीनंतर ही फेरी जाहीर होईल.
- मीनाक्षी राऊत, प्रभारी उपसंचालक, शिक्षण विभाग

Web Title: SSC re-exam results today