एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची घोषणा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत केली. 

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत केली. 

गेली वर्षेभर वेतनवाढीसाठी कर्मचारी संघटना आणि एसटी महामंडळाचे प्रशासन यांच्यामध्ये बैठकीच्या फैरी झडत होत्या. एसटी महामंडळाच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली असून, कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून एक वर्ष एवढा कमी करण्यात आला आहे. कनिष्ठ वेतनश्रेणीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक वर्ष कनिष्ठ वेतन श्रेणीमध्ये समाधानकारक काम केले, तर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होणार आहे. एक एप्रिलपासून कनिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ होणार आहे. 

Web Title: ST announced a salary increase of employees