एसटीची तिकीट दरवाढ अटळ? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - इंधन दरवाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे येणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने 30 टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना सादर केला आहे. त्यानुसार एक रुपया 80 पैसे ते पाच रुपयांपर्यंतची वाढ होण्याची शक्‍यता आहे. रावते अनुकूल असल्याने तिकीट दरवाढ अटळ मानली जात आहे. 

गेल्या वर्षभरात झालेल्या इंधन दरवाढीमुळे एसटीवर 470 कोटींचा भार पडत आहे. तेवढाच खर्च आता कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर होत आहे. तसेच वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढलेल्या किमती आणि टोल खर्चही एसटीला डोईजड झाला आहे. त्यामुळे एसटीचा तोटा दोन हजार कोटींपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नाइलाजाने हा दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तसा प्रस्ताव महामंडळाच्या अध्यक्षांना सादर करण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळताच दरवाढ करण्यात येणार आहे. दिवाकर रावते यांनी यापूर्वीच एसटीच्या दरवाढीचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी एसटीच्या इंधनासाठी सूट मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ही सूट न मिळाल्यास रावते हा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: ST bus ticket price hike