esakal | डिझेल दरवाढीचा परिणाम; एसटी प्रवासही महागणार
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी

डिझेल दरवाढीचा परिणाम; एसटी प्रवासही महागणार

sakal_logo
By
नामदेव कुंभार

डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. एसटी प्रशासनाकडून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. एसटी प्रशासनाला डिझेल खर्चावर दरमहा सुमारे १२० ते १४० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. कोरोना काळात एसटीची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे तोट्यात भर पडत आहे. महामंडळाच्या सुमारे १६ हजार बस डिझेलवर धावतात. यात पूर्ण क्षमतेने सेवा सुरू झाल्यास रोज १२ लाख ५०० लिटर डिझेलचा वापर होतो. सध्या ही गरज आठ लाख लिटर इतकी आहे. त्यामुळे प्रवासी भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे.

एसटी प्रशासनाने राज्य सरकारकडे 17 टक्क्यांपर्यंत भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला असून किमान भाडेवाढ 5 रुपये असेल. लवकरच राज्य सरकार व एसटी महामंडळाकडून यावर अंतिम निर्णय होणार आहेत. एसटीची भाडेवाढ सहा किलोमीटरच्या टप्प्यानंतर होते. एसटी प्रशासनाच्या प्रस्तावानुसार साध्या गाडीचे दर हे नऊ किलोमीटरपासून पुढे वाढणारे आहेत. 100 किलोमीटरपर्यंत साधारण 20 ते 25 रुपयांची वाढ होणार असून त्यापुढील प्रवासासाठी प्रवाशांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याटी शक्यता आहे. कमी अंतरावर जास्त वाढ नसेल. वातानुकूलित बसगाड्यांच्या दराच्या वाढीचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा: ...तरच विधानसभा अध्यक्षपद स्वीकारणार - भास्कर जाधव

सतत होणारी डिझेल दरवाढ, कोरोनामुळे कमी झालेले प्रवासी उत्पन्न आणि महागाई भत्त्यासह अन्य खर्चात झालेली वाढ, यामुळेच एसटीवर आर्थिक भार वाढला आहे. परिणामी यावर तोडगा काढण्यासाठी एसटी प्रशासनानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पुढील काही दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

loading image