एसटीच्या वाहक-चालक पदाची रविवारी परीक्षा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ हजार 22 चालक व वाहक पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी 42 हजार 232 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यांची आता रविवारी (ता. 24) परीक्षा होणार आहे.

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ हजार 22 चालक व वाहक पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी 42 हजार 232 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यांची आता रविवारी (ता. 24) परीक्षा होणार आहे. परंतु, दोन हजार 406 जागा राखीव असूनही केवळ 932 महिला उमेदवारांनीच अर्ज केल्याचे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पुणे, सोलापूर, बुलडाणा, धुळे, औरंगाबाद, जालना, जळगाव, अमरावती, परभणी, यवतमाळ, नाशिक आणि अकोला या दुष्काळी जिल्ह्यांमधून चालक व वाहकांच्या जागा भरण्यात येत आहेत.

अनुसूचित जमातीसाठी 685 जागा असूनही या प्रवर्गातील दोन हजार 406 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची रविवारी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत लेखी परीक्षा होईल, असेही भोसले म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Department Exam on Sunday