भाजीपाल्यासाठी एसटी सवलत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

मुंबई -एसटी बसमधून २४ नोव्हेंबरपर्यंत ५० किलो भाजीपाला निःशुल्क वाहून नेण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. चलनातून ५०० व हजाराच्या नोटा रद्द झाल्याने शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य एसटी परिवहन महामंडळाने शेतकऱ्याला ५० किलोपर्यंतचा भाजीपाला एसटीने विनाशुल्क वाहून नेण्याची सवलत दिली आहे. ही खास सवलत २४ नोव्हेंबरपर्यंत असेल.

Web Title: ST discounts for vegetables