एसटीचे सव्वा लाख कर्मचारी उद्धव ठाकरेंना पाठवणार पत्र, काय आहे त्या पत्रामध्ये?

प्रशांत कांबळे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

एसटी महामंडळाला राज्य सरकारचा एक विभाग म्हणून दर्जा मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना एसटी कर्मचारी पत्र पाठवणार असून, त्याला आमचा पाठिंबा आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, राज्य एसटी कर्मचारी काँग्रेस

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करून कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासाठी सव्वा लाख कर्मचारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. या पत्राच्या माध्यमातून चालक, वाहक, सहायक, लिपिक आदी कर्मचारी आपली कैफियत मांडणार असून, यासंदर्भातील पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नसल्याने वेतनश्रेणी आणि इतर सेवा-सुविधांमध्ये फरक पडत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून एसटीला राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्याची मोहीम राबवली होती; मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या वर्षीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यासाठी एसटी कर्मचारी सरसावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: St Employee write Letter to uddhav thackeray