राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप; प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

राज्यातील सांगली, भंडारा, औरंगाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, लातूर, नगर, नागपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे मध्यरात्रीपासूनच कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे या स्थानकात एसटी केवळ जागेवर उभ्या आहेत व यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

पुणे - राज्यातील काही डेपोंमधील एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढीच्या मुख्य मागणीसह अन्य इतर मागण्यांसाठी हा बंद पुकारला गेला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन या बंदची हाक दिली आहे. पण, प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे.

महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटना (संलग्न आयटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) इ. संघटनांतर्फे हा संप पुकारला गेला असून त्यांनी मध्यरात्री बारापासून संपाला सुरवात केली. या संपात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक उत्सफूर्तपणे सहभागी होतील.  

राज्यातील सांगली, भंडारा, औरंगाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, लातूर, नगर, नागपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे मध्यरात्रीपासूनच कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे या स्थानकात एसटी केवळ जागेवर उभ्या आहेत व यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. ठाण्यातील खोपट आणि वंदना येथील आगरातून काल पासून केवळ 20 गाड्या रवाना झाले आहेत रोज ठाण्यातील खोपट आणि वंदना आगार येथून 200 हुन अधिक गाड्या रवाना होतात, आज संप असल्यामुळे ठाण्यातील दोन्ही आगारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

st strike

नागपूरातील गणेशपेठ बस स्थानकात अर्ध्यापेक्षा ज्यास्त बसेस जागेवरच ठप्प आहेत, तर कर्मचारी संपावर आहेत. सांगलीत शिवशाही एसटी वगळता सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. पुण्यातील स्वारगेट व शिवाजीनगरध्येही अत्यंत कमी एसटी या सेवेत आहेत, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुक्कामी गेलेल्या गाड्या फक्त सेवेत असतील. पुण्यातील कर्मचारी डेपोत एसटी लावल्यानंतर संपात सहभागी होतील. संपात श्रीरामपूर बस्थानाकातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.

कोल्हापुरात मात्र या संपाला संमिश्र प्रतिसाद असून, जसे कर्मचारी उपलब्ध होतील, तशा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न कोल्हापुरात सुरु आहे. सिंधुदुर्गमध्ये एसटी कामगार संघटनेने पूर्णतः  संप पुकारला आहे. लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरू असली, तरी लांब पल्ल्याच्या शिवशाही व इतर गाड्यांची वाहतूक सुरू झाली नाही. 

कामबंद आंदोलन सुरू झाले असले, तरीही राज्यातील काही शहरांमध्ये एसटी सेवा सुरळीत चालू आहे. सुट्य़ांच्या काळात हा संप पुकारला गेल्याने व या संपाची पूर्वकल्पना नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  

Web Title: st employees on strike in state from midnight