लाल परीचे भाडे पुन्हा वाढणार 

लाल परीचे भाडे पुन्हा वाढणार 

सोलापूर : राज्यात दिवसेंदिवस डिझेल व पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. दुसरीकडे ऊसदर, एसटी कर्मचारी आणि आरक्षण या बाबींमुळे राज्य परिवहन महामंडळाला या वर्षी सुमारे पाचशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्याचे खापर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या माथी मारण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

उसाच्या वाढीव एफआरपीसाठी दरवर्षी शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जातात. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनीही यंदा संप केला. तसेच आरक्षणाच्या आंदोलनात राज्य परिवहनला तब्बल साडेचारशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अगोदरच वर्षाला सुमारे पाचशे कोटींचा भुर्दंड एसटी महामंडळाला सोसावा लागत आहे. त्यातच पुन्हा मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन-चार रुपयांची वाढ झाली आहे.

राज्य परिवहनला त्यामुळे सुमारे 65 ते 70 कोटी रुपयांचा अतिरिक्‍त भार सोसावा लागत आहे. त्याचा फटका आता सर्वसामान्यांना वाढीव भाड्याच्या स्वरूपात सहन करावा लागणार आहे. 

आकडे बोलतात... 

एकूण एसटी बसेस 
18,026 
शिवशाही बसेस 
974 
प्रस्तावित बसेस 
600 
इंधनावरील खर्च 
65-70 कोटी 
नऊ महिन्यांतील नुकसान 
457 कोटी .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com