एसटीने प्रवास करताय? तर...

Smart-Card
Smart-Card

सोलापूर - राज्य परिवहन महामंडळाने आता ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना प्रवासातील सवलतीसाठी 31 डिसेंबरपर्यंत स्मार्ट कार्ड घेणे बंधनकारक केले आहे. नवीन परिपत्रकानुसार त्यांना 50 रुपये भरावे लागणार असून, त्यातून राज्य परिवहनला 17 कोटी 20 लाख रुपये मिळणार आहेत. 1 जानेवारीपासून स्मार्ट कार्डशिवाय सवलतीचा प्रवास मिळणार नाही, असेही राज्य परिवहन महामंडळाने स्पष्ट केले आहे.

मतदान ओळखपत्र दाखवून ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला चार हजार किलोमीटरचा सवलतीत प्रवास करता येत होता. सोलापूरसह राज्यभरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 23 लाख असून, सवलतीत एसटी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या 12 लाखांहून अधिक आहे.

स्मार्ट कार्डसाठी होणारी गर्दी पाहता राज्य परिवहनने खासगी एजंट नियुक्‍त केले आहेत. सध्या सोलापूर बसस्थानकात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी निर्माण केली असून, त्यासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत सेवा दिली जात आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी वेळ लागणार असल्याने विद्यार्थी तसेच इतर सवलतीधारकांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या जुन्या पद्धतीनेच लाभ दिला जातोय. मात्र, 1 जानेवारीपासून सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्याची स्थिती
ज्येष्ठ नागरिकांची संख्या - 22.47 लाख
शालेय विद्यार्थ्यांची संख्या - 11.93 लाख
प्रतिव्यक्‍ती शुल्क - 50 रुपये
स्मार्ट कार्डद्वारे मिळणारी रक्‍कम - 17.20 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com