एसटी प्रवास सुखाचा होणार! विविध लाभार्थींना लवकरच स्मार्टकार्ड

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 3 मे 2018

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवास सवलत योजना घेणाऱ्या लाभार्थींना लवकरच "स्मार्ट कार्ड' मिळणार आहे. या कार्डामुळे सवलतीचे प्रवासी आणि वाहक यांच्यामधील प्रवासादरम्यानच्या कटकटी थांबून एसटीचा प्रवास सुखाचा होणार आहे. मात्र, या सवलत योजनांमुळे आधीच तोट्यात असणाऱ्या एसटीवर दरवर्षी 1,359 कोटींचा बोजा पडणार आहे. 

ही सवलत देताना बऱ्याचवेळा ओळखपत्र, त्यावरील फोटो, जन्मतारीख, जन्मतारखेच्या दाखल्याची खातरजमा, ओळखपत्र नूतनीकरण यावरून सवलतधारक आणि वाहक यांच्यात वाद निर्माण होतात. या स्मार्ट कार्डमुळे हे थांबणार आहे. तसेच, बनावट लाभार्थींना चाप बसणार आहे. याचबरोबर एसटी प्रशासनाकडे सर्व लाभार्थ्यांची माहिती व संख्या यांची विश्‍वसनीय माहिती उपलब्ध होणार आहे. 

सध्या यांना लाभ 

राज्य परिवहन महामंडळ सामाजिक, आर्थिक दुर्बल घटक, शालेय विद्यार्थी, उच्च व तंत्र शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, सरकारी पातळीवरील क्रीडा पुरस्कार मिळवणारे खेळाडू, ज्येष्ठ नगारिक, अंध व त्यांचे सहकारी, अपंग व अपंगांचे सहकारी, दलितमित्र, मतिमंद, स्वातंत्र्यसैनिक, आदिवासी सेवक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, क्षयरुग्ण, कर्करुग्ण, कुष्ठरोगी आदींना एसटी प्रवासात सवलत देत आहे. 

स्मार्ट कार्डमध्ये असणार काय? 

लाभार्थींचा प्रकार, नाव, सवलतीचा प्रकार, कायमस्वरूपी अथवा वार्षिक, आधार क्रमांक, वयाची नोंद आदी माहिती या कार्डमध्ये संकलित केलेली असेल. ज्या वेळी सवलतधारक प्रवास करेल, त्या वेळी वाहकाने त्याच्याकडे असलेल्या तिकीट उपकरणावर हे स्मार्ट कार्ड चिकटवले असता सवलतधारकाच्या सर्व नोंदी वाहकास समजून येतील. 

- सवलतीपोटी एसटीला वर्षाला सहन करावा लागणारा आर्थिक बोजा ः 1359 कोटी 23 लाख 4158 रुपये. 
- शालेय विद्यार्थी मासिक पास संख्या ः 87 लाख 31 हजार 308 
- उच्च व तंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी ः 58 लाख 60 हजार 856 
- ज्येष्ठ नागरिक ः 1 कोटी 25 लाख 
- क्षयरोगी, कर्करुग्ण व कुष्ठरोगी एकूण प्रवासी ः 77 हजार 908 

Web Title: ST journey will be prosperous Smartcard to different beneficiaries soon