एसटीत महाबदल्या

ST-Logo
ST-Logo

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने कोकणातील ३,३०७ चालक आणि वाहकांसाठी इच्छाबदल्या जाहीर केल्या आहेत. त्यांच्यात १,६६९ चालक आणि १,६३८ वाहकांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या बदल्या झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेटच मिळाली आहे.

एसटी महामंडळातील चालक- वाहकांच्या बदल्या १५ वर्षांपासून रखडल्या होत्या. आता या चालक- वाहकांची बदल्यांची प्रतीक्षा संपली आहे. तब्बल ३,३०७ चालक- वाहकांना इच्छित स्थळी बदली देऊन एसटी महामंडळाने नववर्षानिमित्त सुखद धक्का दिला आहे. त्यांच्यापैकी बहुतेक कर्मचारी रुजू झाल्यापासून कोकणात वास्तव्याला होते.

या कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाकडे इच्छाबदलीसाठी अर्ज केले होते. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या निर्देशांनुसार एसटी प्रशासनाने त्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. विभागप्रमुखांनी या चालक, वाहकांना सात जानेवारीपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

या ठिकाणी नेमणूक (वाहक/चालक) - अकोला (६३), अमरावती (४६/१५), औरंगाबाद (३१/५४), नगर (१३९/१६४), उस्मानाबाद (१०५/१९४), धुळे (७१/१२८), नाशिक (१९७/१६६), नांदेड (६७/१०८), नागपूर (६/३), कोल्हापूर (१२२/१५७), जालना (१६/२२), जळगाव (१८०/६८), भंडारा (१/३), मुंबई (७/२), यवतमाळ (५१), परभणी (७२/८८), पालघर (३/१), पुणे (७६/३३), रायगड (२/१), रत्नागिरी (१), सिंधुदुर्ग (१), लातूर (१२/१९), वर्धा (७/१२), गडचिरोली (५/७), सातारा (१०६/९२), सांगली (७५/१२०), बीड (२७), सोलापूर (९०/१२१), बुलडाणा (४४/६६), चंद्रपूर (२/७), ठाणे (१४/३).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com