एसटीची भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

सांगली  - राज्यात एसटीचा प्रवास उद्या (ता. १५) मध्यरात्रीपासून १८ टक्क्‍यांनी महागणार आहे. कर्मचारी वेतनवाढ, डिझेलच्या दरात वाढ आणि देखभाल दुरुस्तीत वाढीमुळे एसटी महामंडळाने आज मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. तो एक दिवसाने लांबणीवर टाकला आहे.
इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी सुमारे ४६० कोटींचा बोजा वाढला आहे.

कामगारांसाठी नुकतीच चार हजार ८४९ कोटींची वेतनवाढ करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. यापुढे तिकिटाची भाडे आकारणी पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारणी, तर आठ रुपये तिकीट असल्यास दहा रुपये तिकीटदर आकारला जाईल. 

Web Title: ST rent increase

टॅग्स